40 सिनेमे, 3 फ्लॅट आणि 4 गाड्या, ममता कुलकर्णीने कुणासाठी इतकं सर्व सोडलं? अभिनेत्रीनेच सांगितलं

8 डिसेंबर 2024

90 च्या दशकातील ग्लॅमरस अभिनेत्री ममता कुलकर्णी जवळपास 25 वर्षानंतर भारतात परतली आहे

महाकुंभमध्ये सहभागी होण्यासाठी भारतात परतल्याचं ममता कुलकर्णी हीने व्हीडिओतून म्हटलंय

माझ्याकडे 40 सिनेमे, 3 फ्लॅट आणि 4 गाड्या होत्या, वर्ल्डवाईड 50 कॉन्सर्ट केले होते, मात्र मी हे सर्व सोडून दिलं, असं ममता कुलकर्णीने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं 

"मी सत्याच्या शोधात निघाले होते, जसे गौतम बुद्ध निघाले होते, मी फक्त तप करत होते, भक्तीत लीन झाले होते"

अभिनेत्री विरुद्ध 2 हजार कोटी रुपयांच्या ड्रग्ज तस्करी प्रकरणात अनेक वर्ष खटला सुरु होता, मात्र तिला बॉम्बे हायकोर्टाकडून क्लिन चिट मिळाली

ममता कुलकर्णीने बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार नसल्याचं स्पष्ट केलं, मी इथे बॉलिवूडमध्ये परतण्यासाठी आलेली नाही, असं अभिनेत्रीने म्हटलं

प्रत्येक गोष्ट त्या त्या वयात शोभते, मी आयुष्याच्या त्या त्या टप्प्यात मजा केली, मात्र आता मी पुढे गेली आहे, असंही अभिनेत्रीने म्हटलं