ही तर आमचं नाक कापेल , परत येईल तेव्हा..! प्रसिद्ध अभिनेत्रीला नातेवाईकांचे टोमणे..
18 November 2024
Created By : Manasi Mande
'ये हे मोहब्बतें' मालिकेमधून घराघरात पोहोचलेल्या दिव्यांका त्रिपाठीचा हा प्रवास खूप सोपा नव्हता. (photos : Instagram)
आज तिला जी लोकप्रियता मिळते त्यासाठी तिने प्रचंड मेहनत केलीये, बरेच कष्ट उपसलेत.
आपण अभिनयाच्या क्षेत्रात येण्याचं ठरवलं पण तेव्हा नातेवाईकांचे बरेच टोमणे ऐकावे लागले असं दिव्यांकाने एका मुलाखतीत सांगितलं.
अनेक नातेवाईकांना दिव्यांकाचं हे काम आवडलं नाही, ती कुटुंबियाचं नाक कापेल असं त्यांचं म्हणणं होतं.
काही दिवसांतच थकेल-हरेल आणि घरी परत येईल असं म्हणत नातेवाईकांनी तिचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला.
पण दिव्यांकाच्या पालकांनी तिला खूप सपोर्ट केला. आज ती ज्या स्थानावर आहे, ते पाहून टोमणे मारणारे नातेवाईकच तिची प्रशंसा करतात.
दिव्यांकाने 2016 साली विवेक दहियाशी लग्न केलं. त्या दोघांची जोडीही बरीच लोकप्रिय आहे.
मायरा वायकुळची छोट्या भावासोबत पहिली भाऊबीज
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा