'या' सेलिब्रिटींच्या घराचा गौरी खानने केला मेकओव्हर (photo : Instagram)

25 November 2023

Created By : Manasi Mande

किंग खान शाहरूखची पत्नी गौरी खान नामवंत डिझायनर आहे. तिने नुकतंच अभिनेत्री अनन्या पांडेचं नवं घर सजवलं.  

मात्र अनन्यापूर्वी गौरी खानने  इतरही सेलिब्रिटीजचं घर डिझाईन केलं आहे.

अभिनेत्री कतरिना कैफच्या घराचं संपूर्ण डिझाइन गौरी खानने केलं.

गौरी आणि शाहरुखचा जवळचा मित्र असलेल्या दिग्दर्शक करण जोहरच्या घराचाही गौरीने मेकओव्हर केला होता.

अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसचे घरही गौरी खानने डेकोरेट केलं होते, त्याचे फोटो इंटरनेटवर व्हायरल झाले.

बॉलिवूडचा चॉकलेट बॉय रणबीर कपूरचे घर सजवण्यातही गौरी खानचा हात आहे. तिने सोशल मीडियावरही फोटो शेअर केले होते.

या लिस्टमध्ये सिद्धार्थ मल्होत्राचंही नाव आहे. त्याच्या घराचं इंटिरिअर डिझाइनिंग गौरी खानने केलं होतं.