अनु मलिकची लेक अदा मलिकला पाहिलंत का? पाहा सुंदर फोटो
20 मार्च 2025
Created By : मयुरी सर्जेराव
बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक अनु मलिक यांना दोन मुली आहेत. मोठ्या मुलीचे नाव अनमोल आणि धाकट्या मुलीचे नाव अदा मलिक
वडिलांप्रमाणेच अनमोल मलिकने गायनाच्या जगात करिअर केलं आहे. तर अदा फॅशन डिझायनर आहे
इंस्टाग्रामवर अदाचे अनेक फोटो आणि तिच्या क्षेत्राबद्दल तुम्हाला माहिती मिळेल
अदा तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर ज्या स्टार्ससाठी कॉस्ट्यूम डिझाइन करते त्यांचे फोटो शेअर करत असते
अदा अभिनयाच्या क्षेत्रात नसली तरी सौंदर्याच्या बाबतीत ती कोणत्याही अभिनेत्रीपेक्षा कमी नाही
अदा 30 वर्षांची आहे, पण तिच्याकडे पाहून तुम्ही तिच्या वयाचा अंदाज लावू शकत नाही.
अदाने न्यू यॉर्कमधील पार्सन्स स्कूल ऑफ डिझाइनमधून फॅशन डिझायनिंगचा कोर्स केला आहे. तिने माहिरा शर्मा आणि तनिषा मुखर्जीसह अनेक स्टार्ससाठी काम केलं आहे.
ती सोशल मीडियावर कलाकारांसोबतचे फोटो पोस्ट करत असते