2 लग्नं, 22 वर्षांहून लहान अभिनेत्रीशी जोडलं गेलं या 'सुपरस्टार'चं नाव
07 November 2023
Created By : Manasi Mande
कमल हासन हे फक्त साऊथमध्येच नव्हे तर हिंदी चित्रपटांतीलही यशस्वी अभिनेते आहेत.
साऊथ आणि हिंदी चित्रपटांचे सुपरस्टार असलेले कमल हासन यांनी अनेक भाषांमध्ये काम केलं आहे.
चित्रपट आणि अभिनयाशिवाय ते लव्ह लाईफमुळेही चर्चेत होते. त्यांच्या वाढदिवसानिमित्त काही खास गोष्टी जाणून घेऊया.
कमल हासन यांचे नाव अनेक अभिनेत्रींशी जोडले गेले होते.
अभिनेत्री श्रीविद्यासोबत कमल हासन यांचे नाव जोडले गेले, पण ते नातं फार काळ टिकलं नाही.
ब्रेकअपनंतर अभिनेत्याने 1978 साली वाणी गणपती हिच्याशी लग्न गेले. मात्र १० वर्षांच्या संसारानंतर ते वेगळे झाले.
त्यानंतर कमल हासन आणि सारिका यांनी लग्न केले. पण नात्यात कटुता आल्याने त्यांनी घटस्फोट घेतला.
त्यांना श्रुती आणि अक्षरा हासन अशा दोन मुली आहेत.
रिपोर्ट्सनुसार, २ घटस्फोटांनंतर कमल हासन हे त्यांच्यापेक्षा 22 वर्षांनी लहान सिमरन बग्गा हिच्या प्रेमात पडले. पण नात्याची जाहीर कबुली कधीच दिली नाही.
अनेक नात्यांनंतरही कमल हासन आज सिंगल आहेत. त्यांची लव्ह लाइफ विवादात अडकली तरी त्यांनीमोठ्या पडद्यावर नेहमी राज्य केलं.
सारा की सारा तेंडुलकर ? शुबमन नक्की कोणत्या साराला करतोय डेट ?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा