करिश्मा कपूर सोबत जे घडलं..

13 December 2023

Created By : Manasi Mande

90 च्या दशकात करिश्मा कपूरने मोठ्या पडद्यावर खळबळ माजवली.

तिच्या पदार्पणाच्या पिक्चरमधील एक किस्सा सध्या चांगलाच चर्चेत आहे.

जिगर चित्रपटासाठी ती शूटिंग करत होती.

पण त्यावेळी तिच्यासोबत असं काही घडलं, की तिने रडत थेट घरी धाव घेतली.

रिपोर्ट्सनुसार, एका गाण्याचं शूटिंग करताना करिश्मा एक स्टेप वारंवार चुकत होती.

ज्यामुळे कोरिओग्राफर चिन्नी प्रकाश सर्वांसमोर तिला ओरडले. तेव्हा सलमानच्या वडिलांनी मध्यस्थी केली.

सलीम खान यांनी फोन करून करिश्माची समजूत काढली.