Katrina Kaif :  संस्कारी सून ! करवा चौथच्या दिवशी कतरिनाचा देसी अंदाज,

21 October 2024

Created By : Manasi Mande

अभिनेत्री कतरिना कैफ सदैव चर्चेत असते. तिच्या सौंदर्याचे लाखो चाहते आहेत.(Photos : Instagram)

नुकतचं करवा चौथचा सण साजरा झाला. बॉलिवूडमीधल अनेकींनी हे व्रत केलं.

दरवर्षीप्रमाणे अभिनेत्री कतरिना कैफनेही अभिनेता पती विकी कौशलसाठी हे व्रत केलं. त्याचे सुंदर फोटोही तिने शेअर केले.    

गुलाबी साडी आणि त्यावर मॅचिंग स्लीव्हलेस ब्लाऊज, भांगेत सिंदूर, गळ्यात मंगळसूत्र अशी सजलेली कतरिना प्रचंड सुंदर दिसत होती.

सासूबाईंच्या पाया पडत तिने त्यांचा आशीर्वादही घेतला. अनेकांनी त्यावर  लाईक्स, कमेंट्स करत तिला संस्कारी बहू म्हटलं

विकी कौशलच्या आईचही कतरिनावर खूप प्रेम असून त्या तिचे लाड करताना दिसल्या. दोघींचा हा फोटो खूप व्हायरल झाला आहे.

डिसेंबर 2021 मध्ये विकी आणि कतरिना राजस्थानमध्ये शानदार सोहळ्यात विवाहबंधनात अडकले.

संपूर्ण कौशल फॅमिलीचा हा फोटो, विकी कौशलही नव्या लूक मध्ये दिसला

यावेळी कतरिनाची बहीण इसाबेलही सोबत होती.