'कोकण हार्टेड गर्ल'ने विकत घेतली 'ऑडी' कार; म्हणाली 'अंथरुण पाहून पाय..'

13 January 2025

Created By: Swati Vemul

'कोकण हार्टेड गर्ल' अर्थात इन्फ्लुएन्सर अंकिता वालावलकरने घेतली आलिशान कार

कारसोबतचे फोटो पोस्ट करत अंकिताने व्यक्त केल्या भावना

फार मोठी स्वप्नं बघू नयेत, अंथरूण पाहून पाय पसरावेत हे ऐकत मोठे झालो- अंकिता

पण मोठी स्वप्नं बघायला हरकत काय आहे आणि अंथरूण लहान आहे तर अंथरूण मोठं घेऊ असा विचार करत इथपर्यंत पोहोचलेय- अंकिता

जेव्हा जेव्हा मी एक पाऊल मागे गेलेय ते नेहमीच झेप घेण्यासाठी- अंकिता

गावातून मुंबईत येणं, त्यानंतर दोन बहिणींना मुंबईत आणणं, भाड्याच घर शोधणं, मुंबईत राहणं, स्वतःचं अस्तित्त्व निर्माण करण हा प्रवास सोपा नव्हता- अंकिता

आईबाबांच्या विश्वासामुळे एवढं करू शकले, आज ही घेतलेली गाडी दिखाव्यासाठी नाही तर अंथरूण व्यवस्थित असल्यामुळे घेतली- अंकिता

हा दरवळ आयुष्यभर राहणार...; प्राजक्ता माळीच्या फोटोंवर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव