'कोकणहार्टेड गर्ल' भावी पतीसह पहिल्यांदाच दिसली, स्पेशल स्क्रीनिंगला हजेरी

19  October 2024

Created By : Manasi Mande

बिग बॉस मराठी फेम अंकिता प्रभु वालावलकर बरीच चर्चेत असते. ( Photo : Instagram)

नुकतीच तिने खास पोस्ट शेअर करत प्रेमाची कबुली दिली होती.

दसऱ्याच्या दिवशी अंकिताने होणाऱ्या नवऱ्यासोबतचा फोटो शेअर केला होता.

संगीतकार कुणाल भगत आणि अंकिता लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत.

सूर जुळले म्हणत तिने कुणालसोबतचा फोटो शेअर केला होता.

'पाणी' सिनेमाचा ग्रँड प्रीमियर नुकताच पार पडला.

त्यावेळी रेड कार्पेटवर अंकिता आणि कुणाल पहिल्यांदाच जाहीररित्या एकत्र दिसले.

त्यांच्या या फोटोंवर लाईक्स, कमेंट्सचा पाऊस पडत आहे.