'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातील सर्वच कलाकार अतिशय लोकप्रिय आहेत. विनोदी शैलीनं त्यांनी प्रेक्षकांच्या मनात वेगळंच स्थान निर्माण केलंय. ( Photos : Instagram)
त्यातील एक म्हणजे अभिनेता पृथ्वीक प्रताप. त्याने चाहत्यांना एक सुखद धक्का दिला आहे.
पृथ्वीकने त्याच्या इन्स्टाग्रावर गोड बातमी शेअर केली आहे. तो नुकताच लग्नबंधनात अडकलाय.
एक नवी सुरुवात व्हावी या ही बंधनाने,साक्षीदार व्हावं मग मोगऱ्याच्या ही सुगंधाने! अशी सुंदर कॅप्शन देत त्याने पत्नीसोबत गोड फोटो शेअर केलेत.
अत्यंत साध्या पद्धतीने, गाजावाजा, धूमधडाका न करता त्याने लग्न केलंय. विशेष म्हणजे त्याच्या पत्नीचं नावही प्राजक्ता आहे.
क्रीम कलरची सुंदर साडी नेसून प्राजक्ता गोड दिसत होती, तर पांढऱ्या धोती सेटमध्ये असलेल्या प्ृथ्वीकच्या चेहऱ्यावरही गोड हास्य विलसत होतं.
चाहते आणि इतर कलाकारांनी, प्राजक्ता माळीनेही त्यांच्या फोटोवर लाईक्सचा वर्षाव करत भरपूर शुभेच्छाही दिल्या आहेत.