अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या प्राजक्ता माळीची संपत्ती किती ?
08 August 2024
Created By : Manasi Mande
प्राजक्ता माळी ही मराठी चित्रपटसृष्टीतील नामवंत अभिनेत्री.
सुमधुर हास्य आणि सौंदर्याने तिने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलंय.
आज, अर्थात 8 ऑगस्ट रोजी प्राजक्ताचा वाढदिवस असतो.
मराठी मालिका, चित्रपट आणि वेबसीरिजमध्ये झळकणाऱ्या प्राजक्ताचे लाखो चाहते आहेत.
' जुळून येती रेशीमगाठी ' मालिकेमधून तिला खरी ओळख मिळाली. यात ललित प्रभाकरचीही प्रमुख भूमिका होती.
प्राजक्ताचे एकूण नेटवर्थ लाखोंमध्ये आहे, मात्र त्याबद्दल अधिक स्पष्टता नाही.
चित्रपट, वेबसीरिज तसेच सोशल मीडियावरील पोस्ट्सद्वारे प्राजक्ता रग्गड कमाई करते.
ती अभिनेत्री तर आहेच पण बिझनेसवुमनही आहे. ' प्राजक्तराज ' हा तिचा दागिन्यांचा ब्रँड फेमस आहे.
प्राजक्ता अतिशय आलिशान आयुष्य जगते. कर्जतमध्ये तिचं फार्महाऊसही आहे.
Shweta Tiwari : श्वेता तिवारी तिसरं लग्न करणार ?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा