स्पिन्स्टर पार्टीत मुग्धाने केली धमाल..(photo : insta)

11 December 2023

Created By : Manasi Mande

सारेगमप लिटील चॅम्प्समुळे प्रसिद्ध झालेले मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटेने काही दिवसांपूर्वीच त्यांच्या प्रेमाची कबुली दिली.

तेव्हापासून या दोघांच्या लग्नाबद्दल सर्वांची उत्सुकता वाढली.

काही दिवसांपूर्वीच मुग्धा-प्रथमेशने घरगुती सोहळ्यात , साधेपणाने साखरपुडा केला.

नुकतंच मुग्धाच्या  बहिणीचं लग्न पार पडलं.

त्याचे फोटो मुग्धाने सोशल मीडियावर शेअर केले.

आता मुग्धाच्या घरी पुन्हा लगीनघाई सुरू झाली. तिने तिच्या स्पिन्स्टर पार्टीचेही फोटो शेअर केले आहेत.

मित्र-मैत्रिणींसोबत केलेल्या या पार्टीत मुग्धा खूप खुश दिसत्ये.

bride to be चा टॅग, डोक्यावर मुकुट घालून तिने खूप धमाल केल्याचं दिसतंय.