मायरा वायकूळच्या भावाचं बारसं थाटात , नाव काय ठेवलं ? 

13 December 2024

Created By : Manasi Mande

बालकलाकार मायरा वायकुळ ही तिच्या निरागस अभिनयामुळे घराघरांत पोहोचली. मालिका, चित्रपट तसेच सोशल मीडियावरील रील्समधून ती प्रेक्षकांचं मनोरंजन करते. (photos : Instagram)

काही महिन्यांपूर्वीच ती मोठी ताई झाली, तिच्या घरी लहान भावाचं आगमन झालं. पोस्टद्वारे ही गुड न्यूज तिने सर्वांसोबत शेअर केली.

त्याचा पहिल्या महिन्याचा वाढदिवस, पहिली दिवाळी, भाऊबीज अशी अनेक सेलिब्रेशन करत ते फोटोही तिच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आले होते.

मात्र मायराच्या या गोड, लहान भावाचं नाव काय असा प्रश्न अनेक चाहत्यांच्या मनात होता. अखेर त्याचा उलगडा झाला आहे.

नुकतंच मोठ्या थाटामाटात त्याचा नामकरण विधी अर्थात बारसं पार पडलं.

मायरा वायकूळच्या कुटुंबियांनी लेकाच्या बारशाची झलक शेअर करत त्याचं नावही जाहीर केलं.

यावेळी मायरा आणि तिच्या आईने पिवळ्या रंगाचे कपड घालत  तर तिचे वडील आणि छोट्या भावाने ऑफ व्हाईट रंगाचे कपडे घालत ट्विनिंग केलं.

मायराने तिच्या भावाचं नावही जाहीर केलं, 'व्योम' असं तिच्या भावाचं नाव ठेवण्यात आलंय.

यापूर्वी काही दिवसांपूर्वीच मायरा आणि तिच्या कुटुंबिांनी ख्रिसमसनिमित्त फोटोशूट करत ते खास क्षण शेअर केले होते. त्यावरही लाईक्स, कमेंट्सचा वर्षाव झाला होता.