म्हणून आमचं लग्न होत नाहीये... प्राजक्ता माळीला चाहता असं का म्हणाला  ?

16 December 2024

Created By : Manasi Mande

जुळून येती रेशीमगाठी मधील मेघना असो की फुलंवती मधील मुख्य भूमिका, प्राजक्ता माळीच्या अदाच अनोख्या. (photo:Instagram)

हास्यजत्रेतलं तिचं हास्य पाहून तर लाखो तिच्यावर फिदा होतात.

प्राजक्ताने नुकतेच काही फोटो पोस्ट करत तिचं एक आवडतं गाणंही शेअर केलं.

माय गो टू साँग असं म्हणत तिने गाण्याच्या काही इंग्रजी ओळी लिहील्या.

तिच्या फोटोंवर लाईक्स, कमेंट्सचा पाऊस पडला. अनेकांनी तिच्या रुपाचं भरभरून कौतुक केलं.

एका कमेंटने मात्र सगळ्यांचं लक्ष वेधलं,   ती वाचून सर्वच अवाक् झाले.

म्हणून आमचे लग्न नाही होत आहे पूर्ण वेळ तुझेच फोटो पाहण्या मध्ये जातो....घरचे मुलीचे फोटो दाखवतात आम्ही तुझेच पाहतो😍, अशी कमेंट एका चाहत्याने केली.

प्राजक्ताच्या चाहत्याच्या या हटके कमेंटचीच सध्या सगळीकडे चर्चा आहे.