Prajakta Mali : तुझ्यामुळे नापास होणार मी, प्राजक्ता माळीला चाहत्याने...
17 April 2025
Created By : Manasi Mande
मराठी मालिका, चित्रपट व सीरिजमधून सहजसुंदर वावराने सर्वांना भुरळ पाडणाऱ्या प्राजक्ता माळीचे लाखो चाहते आहेत.
प्राजक्ता फक्त अभिनेत्रीच नव्हे तर एक कवियत्री, निवेदिका, बिझनेसवुमन आणि निर्मातीदेखील आहे.
प्राजक्ता सोशल मीडियावरही बरीच ॲक्टिव्ह असते. इन्स्टाग्रामवर तिचे 20 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.
तिच्य प्रत्येक पोस्टवर, फोटोंवर भरभरून लाईक्स येतात आणि कमेंट्सचाही वर्षाव होतो.
प्राजक्ताने नुकतेच आकाशी रंगाची साडी नेसून सुंदर फोटो शेअर केलेत.
या साडीसोबत तिने हातात शिंदेशाही तोडे आणि गळ्यात मोहनमाळ घातली आहे.
तिच्या या फोटोंवरही लाईक्स कमेंट्सचा पाऊस पडलाय.
अरे Exams चालू आहेत माझे, तुझा चेहरा बघितला पेपर मध्ये उत्तर नाही तुझा चेहराच आठवतोय, यार तुझ्या सुंदर दिसण्यामुळ नापास होणार मी, अशी मजेशीर कमेंट एका चाहत्याने केली आहे.
एवढी कशी cute आहेस प्राजू खरचं माणूस वेडा होतो पाहून सर्वांना पाहून वाटते प्राजक्ता माळी सारखी बायको असावी , असंही एका चाहत्याने लिहीलंय.इतरांनीही तिच्या लूकचे भरभरून कौतुक केलं.