'पुन्हा कर्तव्य आहे' फेम अक्षया हिंदळकर आता बनणार खलनायिका

'पुन्हा कर्तव्य आहे' फेम अक्षया हिंदळकर आता बनणार खलनायिका

11 April 2025

Created By: Swati Vemul

Tv9-Marathi
स्टार प्रवाहवरील अबोली मालिकेत लवकरच सुप्रसिद्ध अभिनेत्री अक्षया हिंदळकरची एण्ट्री होणार

स्टार प्रवाहवरील अबोली मालिकेत लवकरच सुप्रसिद्ध अभिनेत्री अक्षया हिंदळकरची एण्ट्री होणार

याआधी अक्षयाने स्टार प्रवाहच्या 'साता जल्माच्या गाठी', 'तुझ्या इश्काचा नादखुळा' या मालिकांमध्ये मुख्य नायिकेची भूमिका साकारली होती

याआधी अक्षयाने स्टार प्रवाहच्या 'साता जल्माच्या गाठी', 'तुझ्या इश्काचा नादखुळा' या मालिकांमध्ये मुख्य नायिकेची भूमिका साकारली होती

जवळपास 4 वर्षांनंतर 'अबोली' मालिकेतून ती स्टार प्रवाहच्या मालिकेत झळकणार आहे

जवळपास 4 वर्षांनंतर 'अबोली' मालिकेतून ती स्टार प्रवाहच्या मालिकेत झळकणार आहे

सुप्रिया नागरगोजे असं तिच्या व्यक्तिरेखेचं नाव असून ती पहिल्यांदा खलनायिका साकारणार आहे

सुप्रिया नागरगोजे ही आपल्या जुळ्या बहिणीच्या म्हणजेच पौर्णिमाच्या खुनाचा प्रतीशोध घेण्यासाठी प्रयत्न करतेय

तिला पूर्ण खात्री आहे की, पौर्णिमाचा घरगुती गॅस सिलिंडर स्फोटात झालेला मृत्यू हा अपघात नव्हे तर घातपात होता

हा सुनियोजित खून पोर्णिमाच्या सासू-सासऱ्यांनी केला, याची तिला खात्री आहे

परंतु हे सिद्ध करण्यासाठी तिच्याकडे कोणताही पुरावा नाहीये

अशावेळी अबोली आपल्याला आणि आपल्या बहिणीला न्याय मिळवून देईल या अपेक्षेने सुप्रिया अबोलीकडे येते

परंतु फटकळ आणि वाचाळ स्वभाव असलेल्या सुप्रियाच्या बोलण्यावर अबोलीचा विश्वासच बसत नाही

सुप्रिया आपल्या बहिणीला कसा न्याय मिळवून देणार? अबोली सुप्रियाला साथ देणार का? हे मालिकेच्या पुढील भागांमध्ये पाहायला मिळेल

'अबोली' ही मालिका रात्री 11 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते

अमृता खानविलकरचं मुंबईतील आलिशान घर पाहिलंत का? इंटेरिअर खूपच खास