6 वर्षांपूर्वी सोडली ॲक्टिंग, आता केवळ IPL मध्येच दिसते ही अभिनेत्री
5 April 2024
Created By : Manasi Mande
IPL दरम्यान अनेक सेलिब्रिटी आपल्या टीमला सपोर्ट करायला येतात. अभिनेता शाहरुख खानही KKR ला चीअर करायला काही दिवसांपूर्वी आला.
अनुष्काही दरवर्षी पती विराट कोहलीला सपोर्ट करायला येते. पण यंदा IPL दरम्यान ती दिसली नाही. तिने नुकताच मुलगा 'अकाय'ला जन्म दिला.
या स्टार्सव्यतिरिक्त एक अभिनेत्री दर मॅचला तिच्या टीमला सपोर्ट करण्यासाठी येते..
ती अभिनेत्री म्हणजे प्रीति झिंटा. 'पंजाब किंग्स'च्या प्रत्येक मॅचदरम्यान प्रीति मैदानात हजर असते.
प्रीति सध्या मोठ्या पडद्यावर दिसत नाही फक्त IPLमध्येच दिसते. ती लवकरच पुन्हा चित्रपटात झळकणार आहे.
'लाहौर 1947' या चित्रपटातून प्रीति झिंटा सनी देओलसह पुनरागमन करणार आहे. हा पिक्चर आमिर खान प्रोड्यूस करणार आहे.
2018 सालच्या'भैयाजी सुपरहिट' या चित्रपटात प्रीति शेवटची दिसली होती. आता 6 वर्षांनी प्रीति कमबॅक करणार असल्याने तिचे चाहते उत्सुक आहेत.
शाही घराण्याच्या राजकुमारीने अभिनेत्याला केलं प्रपोज; हो म्हणताच केला साखरपुडा
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा