रणदीप-लिनच्या रिसेप्शनमध्ये स्टार्सची मांदियाळी (photo : Insta)

12 December 2023

Created By : Manasi Mande

अभिनेता रणदीप हुडडा आणि लिन लैशराम हे दोघे 29 नोव्हेंबर रोजी लग्नबंधनात अडकले.

मणिपूरमध्ये थाटामाटात त्यांचा विवाहसोहळा पार पडला.

रणदीप-लिनच्या लग्नानिमित्त मुंबईत एक ग्रँड रिसेप्शन झाले.

बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी या रिसेप्शनला हजेरी लावत  रणदीप-लीनला शुभेच्छा दिल्या.

यावेळी रणदीपचे आई-वडील उपस्थित होते.

लीन लैशरामच्या कुटुंबियांनीही या रिसेप्शनला शानदार लूकमध्ये हजेरी लावली.

बॉलिवूडचं पॉवर कपल तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा हातात हात घालून रिसेप्शनला आले.

अभिनेत्री तारा शर्मानेही या सोहळ्याला हजेरी लावली.

ताराने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या सोहळ्याचे फोटोही शेअर केले.

ज्येष्ठ अभिनेत्री रत्ना पाठक आणि नसिरुद्दीन शहा हेही रणदीप-लिनला शुभेच्छा देण्यासाठी आले.

'हायवे' चित्रपटातील रणदीपच्या भूमिकेचे खूप कौतुक झाले.  नामवंत दिग्दर्शक इम्तियाज अलीदेखील उपस्थित होता.

उर्वशी रौतेलाने लाल ड्रेसमध्ये जलवा दाखवत रिसेप्शनला हजेरी लावली.