हाऊसवाईफ ते युट्यूबर, कोट्यवधींची कमाई, आता TVवर जेवण बनवून करणार  धमाल

हाऊसवाईफ ते युट्यूबर, कोट्यवधींची कमाई, आता TVवर जेवण बनवून करणार  धमाल, कोण आहे ही ?

30 January 2025

Created By : Manasi Mande

जेव्हा आमिरने दिला रजनीकांत यांना नकार..

'सेलिब्रिटी मास्टरशेफ' हा कुकिंग रिॲलिटी शो नुकताच सुरू झाला आहे. त्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत. ( Photos: Instagram)

यामध्ये टीव्ही दुनियेतील 11 सेलिब्रिटी सहभागी होणार  आहेत, त्यामध्ये युट्यूबर कविता सिंगचाही समावेश आहे.

कविता यांना कुकिंगचा आधीपासून अनुभव आहे, युट्यूबवर नवनवे कुकिंग व्हिडीओज पोस्ट करून त्या रेसिपीज शेअर करतात.

त्यामुळे या शोमध्ये कविता अनेक सेलिब्रिटींनी कडवी टक्कर देऊ शकतात.

कविता या कोलतकात्याच्या रहिवासी असून त्यांना स्वयंपाकाची खूपच आवड आहे.

2014 साली त्यांचा कुकिंग इन्फ्लुएन्सर म्हणून प्रवास सुरू झाला , त्यांनी युट्यूबवर Kabita's Kitchen हे चॅनेल सुरू केलं.

2017 सालापर्यंत त्यांचे युट्यूबवर लाखो फॉलोअर्स झाले.

सध्या त्यांच्या चॅनेलवर 14 मिलियनपेक्षा अधिक सबस्क्रायबर्स असून ते दिवसागणिक वाढतच आहेत.  या चॅनेलच्या माध्यमातून कविता कोट्यवधींची कमाई करतात.

कविता या त्यांच्या सासूबाईंना इन्स्पिरेशन मानतात. एक हाऊसवाईफ ते टॉप कुकिंग इन्फ्लुएन्सर हा कविता यांचा प्रवास प्रेरणादायी आहे.

'सेलिब्रिटी मास्टरशेफ'  या कुकिंग रिॲलिटी शोमध्ये त्या किती धमाल करतात, हे पाहण्याची सर्वांना उत्सुकता आहे.