Saif Ali Khan : सैफवर ज्या घरात हल्ला झाला त्याची किंमत किती ?

16 January 2025

Created By : Manasi Mande

अभिनेता सैफ अली खान याच्यावर चाकू हल्ला करण्यात आला आहे. त्याच्यावर सध्या लीलावती रुग्णालयात सर्जरी सुरू आहे.

सैफ अली खानच्या वांद्रे येथील घरात मध्यरात्रीच्या सुमारास चोर घुसला. घरातला आवाज ऐकून सैफ बाहेर आला, त्याने चोराला रोखण्याचा प्रयत्न केला.

झटापटीमध्ये चोराने सैफवर हल्ला केला. त्यामध्ये तो जखमी झाला असून दोन जखमा खोलवर आहे.

सैफची प्रकृती सध्या स्थिर असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

वांद्रे येथील ज्या घरात सैफ अली खानवर हल्ला झाला, त्याची किंमत किती माहीत आहे का ?

सैफ करीना सध्या Satguru Sharan या इमारतीत राहतात. रिपोर्ट्सनुसार, त्यांच्या घराची किंमत 10 कोटी रुपये आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सैफ अली खानचे नेटवर्थ 1200 कोटी रुपये आहे. तो वांद्रे येथे पत्नी करीना आणि तैमूर- जेह या मुलांसह राहतो.