'एकच सांगेन माझ्यावर जे...'; बाप्पाला निरोप देण्यापूर्वी श्रेया बुगडेचा खास संदेश

14 September 2024

Created By: Swati Vemul

श्रेया बुगडेनं घरच्या गणपती बाप्पाला दिला निरोप

पाच दिवस भक्तीभावाने पूजा केल्यानंतर श्रेयाने बाप्पाचं केलं विसर्जन

बाप्पासोबतचे खास फोटो श्रेयाने इन्स्टाग्रामवर केले पोस्ट

या फोटोंच्या कॅप्शनमध्ये श्रेयाने बाप्पाविषयी व्यक्त केल्या भावना

'सांभाळून जा.. सोबत दिलेला खाऊ भूक लागली की नक्की खा', असं तिने लिहिलंय

खूप लोकांनी त्यांची बकेट लिस्ट तुला सांगितली असेल- श्रेय बुगडे

त्यामुळे वर्षभर तू खूप बिझी असशील हे माहीत आहे मला. त्यामुळे मी तुला खूप त्रास नाही देणार- श्रेया

एकच सांगेन माझ्यावर जे नितांत प्रेम करून जीव टाकतात त्या सगळ्यांना उदंड आणि निरोगी आयुष्य दे- श्रेया

...आणि हे सगळं करताना मात्र स्वतःला जप, ये लौकर पुढच्या वर्षी, तुला खूप प्रेम, अशी श्रेयाने लिहिली पोस्ट

श्रेयाच्या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव

मोरगावातील 100 वर्षे जुन्या वाड्यात 'मुंज्या' फेम अभिनेत्रीकडून गणेशोत्सव साजरा, नेसली 35 वर्षे जुनी साडी