कोण म्हणेल ही 2 मुलांची आई? श्वेता तिवारीचे फोटो पाहून चाहते घायाळ
07 January 2025
Created By : Manasi Mande
श्वेता तिवारी ही टीव्ही जगतातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. सध्या तिच्या सोशल मीडिया पोस्टची खूप चर्चा असते.
नुकतीच तिने तिच्या अधिकृत अकाऊंटवर काही फोटो पोस्ट केलेत.जांभळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये ती प्रचंड सुंदर दिसत्ये.
या फोटोंनी अनेकांचे लक्ष वेधून घेतलं आहे. कमेंट सेक्शनमध्ये लोकांनी तिचं प्रचंड कौतुक केलंय.
एका युजरने तर श्वेताच्या वयाबाबतच प्रश्न उपस्थित केलाय.'ही दोन मुलांची आई आहे, असं कोण म्हणेल', अशी कमेंट युजरने केली. तर दुसऱ्या युजरने तिला 'यंग मॉम' म्हटलंय.
लोकं बऱ्याचदा श्वेताच्या फिटनेसचं कौतुक करतात.श्वेताला दोन मुलं आहेत. तिने 'कसौटी जिंदगी की' मधून अभिनयाची सुरूवात केली.
श्वेताची दोन लग्नं झाली असून ती दोन्ही मोडली. पहिलं लग्न राजा चौधरीशी तर दुसरं लग्न अभिनव कोहलीशी झालं होतं.
तिचं पर्सनल आयुष्यही खूप चर्चेत असतं. काही दिवसांपूर्वी श्वेताचं नाव विशाल सिंहशी जोडलं गेलं होत, त्यांच्या लग्नाच्याही अपवा उडाल्या होत्या.