'हे' स्टारकिड्स बिझन्समधून करतात कोट्यवधींची कमाई (photo : insta)

04 January 2024

Created By : Manasi Mande

अनेक मोठ्या स्टार्सची मुलं मोठ्या पडद्यावर खास कमाल करू शकले नाहीत. पण ॲक्टिंग सोडल्यावर ते बिझनेसमधून करोडो रुपये कमावतात.

जितेंद्र यांचा मुलगा तुषार कपूर फार फिल्म्समध्ये चमकला नाही. त्याने प्रॉडक्शन हाऊस सुरू केले आहे.

ट्विंकल खन्नाचे ॲक्टिंग करिअर फ्लॉप ठरले, पण धारदार लेखणीने ती सर्वत्र चमकते. ती फिल्म प्रोड्युसरही आहे.

एकेकाळी मोठा पडदा गाजवणारी पूजा भट्ट आता चित्रपटात दिसत नाही. पण ती आता दिग्दर्शक आणि प्रोड्यूसर आहे.

ॲक्टिंग सोडल्यावर उदय चोप्राने भाऊ आदित्यसोबत यशराज फिल्म्स सांभाळण्याकडे लक्ष दिले. सध्या तो डिजीटल विंग सांभाळतो.

जॅकी भगनानीने ॲक्टिंग ट्राय केली, पण त्यात अपयशी झाल्यावर तोही प्रोड्युसर बनला.

हरमन बवेजा हा टीव्ही शो आणि फिल्म्स प्रोड्यूस करून कोट्यवधी कमावतो.

ॲक्टिंग सोडल्यावर पूजा बेदी गोव्यातील मल्टी वेंडर ईकॉमर्स मार्केटप्लेस हॅपी सोलमधून भरपूर कमाई करते.

बॉलिवूडच्या ‘या’ मायलेकींची  जोडी एकदम स्टायलिश