टीव्हीचे हे स्टार्स तर बॉलिवूड सिताऱ्यांपेक्षाही श्रीमंत (photo : Instagram)

24 November 2023

Created By : Manasi Mande

टीव्हीवरचे अनेक कलाकार आज लोकप्रिय असून घराघरात पोचलेत. काहीजण जर बॉलिवूडच्या स्टार्सपेक्षाही अधिक श्रीमंत आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, 2023 मध्ये कपिल शर्माची एकूण संपत्ती अंदाजे 280 कोटी रुपये आहे. रिपोर्ट्सनुसार, तो प्रत्येक एपिसोडसाठी 50 लाख रुपये घेतो

अभिनेत्री श्वेता तिवारीची लोकप्रियता प्रचंड आहे. तिचं नेटवर्थ 81 कोटी रुपये आहे. प्रत्येक एपिसोडसाठी ती 3 लाख रुपये घेते.

'बडे अच्छे लगते हैं' या टीव्ही सीरियलमधून लोकप्रिय झालेला अभिनेता राम कपूर अनेक चित्रपटांमध्येही दिसला आहे. रिपोर्ट्सनुसार त्याच्याकडे एकूण 98 कोटी रुपयांची संपत्ती आहे.

अभिनेत्री साक्षी तन्वरने फक्त टीव्ही मालिकांमध्येच नव्हे तर अनेक महत्वपूर्ण चित्रपटांतही काम केलं आहे. तिची एकूण संपत्ती 37 कोटी रुपये आहे. एका एपिसोडसाठी साक्षी अंदाजे 1.25  लाख रुपये घेते.

रिपोर्ट्सनुसार टीव्ही अभिनेता रोनित रॉय हा 99 कोटी रुपयांच्या मालमत्तेचा मालक आहे. एका एपिसोडसाठी तो सुमारे दीड लाख रुपये आकारतो.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'पवित्र रिश्ता' या मालिकेतून लोकप्रिय झालेली अभिनेत्री अंकिता लोखंडेची एकूण संपत्ती 25 कोटी रुपये आहे. एका एपिसोडद्वारे ती 90 हजार ते 1.5 लाख रुपये कमावते.

कॉमेडियन कृष्णा अभिषेकची एकूण संपत्ती 40 कोटी रुपये आहे आणि तो एका एपिसोडसाठी 10-12 लाख रुपये आकारतो.