वर्षा उसगांवकर यांना 'त्या' गोष्टीचा बसला शॉक, थेट लग्नालाच दिला होता नकार
28 August 2024
Created By : Manasi Mande
'बिग बॉस मराठी ' सीझन 5 मध्ये सहभागी झाल्याने अभिनेत्री वर्षा उसगावकर सध्या चर्चेत आहेत. या शो मध्ये रोज नवा ड्रामा सुरू असतो.
यादरम्यान वर्षा यांनी त्यांच्या लग्नाबद्दलचा एक मजेदार किस्सा निकी तांबोळी हिला सांगितला.
मला वाटायचं मी लव्ह मॅरेज करेन,असं त्या म्हणाल्या. पण त्यांनी त्यांच्या पतीशी लग्न करणयास थेट नकार दिला होता, तेव्हा ट्विस्ट आला.
2000 साली वर्षा यांनी अजय शर्मा यांच्याशी लग्न केलं. मात्र लग्नापूर्वी अजय यांचं वजन अचानक वाढलं होतं, तेव्हा त्यांनी अजय यांच्याशी लग्न करण्यास नकार दिला.
अजय माझ्या घरी आले तेव्हा त्यांचं वजन वाढलं होतं, ते थोडे जाड दिसत होते. मी आधी ज्या व्यक्तीला भेटले होते, ते त्याच्यासारखे बिलकूल दिसत नव्हते.
ते कोणीतरी दुसरीच व्यक्ती वाटत होते. या व्यक्तीशी मी लग्न करूच शकणार नाही असं मला वाटलं, असं वर्षा यांनी नमूद केलं.
तुम्ही खूप बदललात, असं वर्षा यांनी अजयना सांगितलं. आपलं वजन वाढल्याचं त्यान कबूल केलं. पण तू अजून तशीच आहेस, असं ते म्हणाले.
वर्षा उसगांवकर या मराठी आणि हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. त्यांचे अनेक चित्रपट गाजलेत.