Kusha Kapila : सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर कुशा कपिलाचं नेटवर्थ किती  ?

25 December 2024

Created By : Manasi Mande

कुशा कपिला सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय आहे. इन्स्टाग्रामवर तिचे 35 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. (photos : Instagram)

तिच्या वेगवेगळ्या पोस्ट, मजेशीर व्हिडीओ लोकांना खूप आवडतात.

दिल्लीत जन्मलेल्या कुशाने करिअरच्या सुरूवातील फॅशन रिपोर्टर आणि कंटेंट रायटर म्हणून काम केलं.

idivia ब्रँडसाठी व्हिडीओ बनवून ती लोकप्रिय झाली, तिचं काम अनेकांना आवडलं.

2019मध्ये तिने स्वत:चं काम सुरू केलं. कॉमिक टायमिंग आणि क्रिएटिव्हिटीने डिजीटल वर्ल्डमध्ये तिचं नाव बरंच गाजलं.

तिने अनेक वेब सीरिज तसेच काही चित्रपटातही काम केलं. 2023मध्ये तिने कान्सच्या रेड कार्पेटवर डेब्यू केलं.

रिपोर्ट्सनुसार, कुशाचे नेटवर्थ 20 कोटी रुपये आहे.  ब्रँड एंडोर्समेंट, यूट्यूब आणि अनेक शोजमधून ती बक्कळ कमाई करते.