शाहरूख खानची तिन्ही मुलं नेहमी चर्चेत असतात. आर्यन आणि सुहाना खान हे त्यांच्या लव्ह लाईफमुळेही लाईमलाइटमध्ये असतात. ( photo : Social Media)
तर अबराम त्याच्या क्यूटनेसमुळे चर्चेत असतो.
शाहरुखचा मोठा मुलगा आर्यन लवकरच दिग्दर्शक म्हणून डेब्यू करणार आहे. मात्र त्याच्या लव्ह लाईफचीही चर्चा असते.
आर्यन नुकताच न्यू ईअर पार्टीसाठी पोहोचला, तेथे त्याची कथित गर्लफ्रेंडही होती. आर्यनचं जिच्याशी नाव जोडलं जातयं, ती आहे तरी कोण ?
आर्यन खानचं नाव बऱ्याच दिवसांपासून ब्राझिलियन अभिनेत्री-मॉडेल Larissa Bonesi हिच्याशी जोडलं जातंय. 2023 मध्ये अमेरिकन डीजे मार्टिनच्या कॉन्सर्टमध्ये दिसले होते.
Larissa Bonesi हिने 'देसी बॉईज' चित्रपटातील 'सुबह होने न दे' गाण्यातून बॉलिवूडमध्ये काम सुरू केलं. ती अक्षय कुमार-जॉन अब्राहमसोबत दिसली.
गुरु रंधावा याच्यासह अनेक गायकांच्या म्यूझिक व्हिडीओमध्येही ती दिसली. बॉबी देओलसोबतही तिने काम केलंय.