बिग बॉस 16 चा विजेता एमसी स्टॅन कोणत्या ना कोणत्या कारणाने वादात असतो. आता, त्याच्यावर सोशल मीडियावर अनोळखी महिला इन्फ्ल्यूएंसर्सना फ्लर्टी मेसेज पाठवल्याचा आरोप आहे.
काही महिला इन्फ्ल्यूएंसर्सनी सोशल मीडियावर स्क्रीनशॉट शेअर केले आहेत.
एमसी स्टॅनच्या डीएमचे स्क्रीनशॉट व्हायरल होत आहेत ज्यामध्ये तो अनोळखी मुलींना सुंदर, खूप मस्त असे मेसेज करताना तो दिसत आहे
एमसी स्टॅनने आणखी एका महिला इन्फ्ल्यूएंसर डीएम केलं होतं. त्याने नैला हुसेनला मेसेज केला होता "अस्सलाम वालेकुम आप बहुत खूबसूरत लग रहे हैं.'
आता सोशल मीडियावर लोकांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत आणि एमसी स्टॅनमधील या बदलामुळे लोक आश्चर्यचकित झाले आहेत.
बरेच लोक हे एक लज्जास्पद कृत्य असल्याचं म्हणत आहेत.
एमसी स्टॅन 25 वर्षांचा आहे आणि रॅपर असण्यासोबतच तो एक गायक आणि निर्माता देखील आहे.