दिवाळीच्या या फटाक्याशी 'पारू'ने केली स्वत:ची तुलना

30 October 2024

Created By: Swati Vemul

झी मराठी वाहिनीवरील 'पारू' मालिकेतील शरयू सोनावणेनं दिला दिवाळीच्या आठवणींना उजाळा

"लहानपणी शाळेत दिवाळीची सुट्टी मिळायची आणि त्यासोबत सुट्टीचा गृहपाठही मिळायचा"

"मला सर्वात जास्त गंमत तो गृहपाठ सुट्टीच्या पहिल्याच दिवशी पूर्ण करण्यात होती."

गृहपाठ पूर्ण केल्यावर बाकीचे दिवस शॉपिंग करायची आणि मज्जा करायची- शरयू

दिवाळीला पहाटे 4-5 वाजता उठायचं, नवीन कपडे घालायचे, आई- मोठी बहीण दारात रांगोळी काढायच्या- शरयू

"मी दिवाळीच्या तुडतुडी या फटाक्यासारखी आहे असं मला वाटतं"

 "तुडतुडी कशी पेटल्यावर तुडतुड आवाज येतो आणि छान रंग येतात तशीच मी आहे."

दिवाळीत जे चटपटीत आणि तिखट पदार्थ आहेत मी त्यांच्यासारखी आहे- शरयू

तिखट शेव, मक्याचा आणि पोह्याचा झणझणीत चिवडा यांसारखी मी आहे- शरयू

"दिसायला आणि स्वभावाने जरीही मी लाडवासारखी गोड असेन पण माझा मूळ स्वभाव तिखट शेवसारखा आहे."

सोहैलशी पळून लग्न करण्यासाठी ज्याच्याशी मोडला साखरपुडा, त्यालाच डेट करतेय सीमा