कलेचा मिनी कुंभच आहे..TV9च्या फेस्टीव्हल ऑफ इंडियात म्हणाले नकवी

10 ऑक्टोबर 2024

Created By: अतुल कांबळे

दुर्गा पूजेच्या निमित्ताने TV9 भारतवर्षचा पाच दिवसीय 'फेस्टीव्हल ऑफ इंडिया' सुरु आहे

10 ऑक्टोबर हा दुसरा दिवस असून हा 'फेस्टीव्हल ऑफ इंडिया' 13 तारखेला संपणार आहे

फेस्टीव्हलच्या दुसऱ्या दिवशी अनेक हस्ती आल्या होत्या.भाजपा नेते मुख्तार अब्बास नकवी,आपचे मनीष सिसोदिया आले

 हा फेस्टीव्हल आस्थेची ताकद आणि कौशल्याने भरपूर असलेला कलेचा मिनी कुंभ असल्याचे मुख्तार अब्बास नकवी यांनी सांगितले

 हा सोहळा आपले संस्कार, संस्कृती आणि आस्थेबाबत लोकांत जागरुकता आणत असल्याचे नकवी म्हणाले

आपचे नेते दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष  सिसोदिया यांनी भेट देऊन आशीवार्द घेतले