रताळे खाण्याचे फायदे
रताळ्यात कॅलरी आणि स्टार्च अतिशय कमी असते. यामध्ये फायबर, अँटी-ऑक्सीडेंट्स, व्हिटॅमिन आणि क्षार भरपूर असतात.
रताळ्यातील व्हिटॅमिन बी 6 हे शरीरात होमोसिस्टीन अमीनो अॅसिड वाढवण्यास उपयोगी पडते. यामुळे आजारांचा धोका कमी होतो.
रताळे ‘व्हिटॅमिन डी’चा चांगला सोर्स असल्याने दात, हाडे, त्वचा आणि नसांची वाढ, आणि मजबुतीसाठी आवश्यक असते.
रताळ्यात भरपूर आयर्न असल्याने याच्या सेवनाने एनर्जी वाढते, रोग प्रतिकारशक्ती वाढते, ब्लड सेल्सची निर्मिती होते.
रताळ्यातील कॅरोटीनॉयड तत्व ब्लड शुगर नियंत्रित करते, यातील व्हिटॅमिन बी 6 डायबिटीज हार्ट डिसीजमध्ये लाभदायक आहे.
रताळे व्हिटॅमिन ए भरपूर असल्याने शरीराची 90 टक्केपर्यंत व्हिटॅमिन ए ची पूर्तता होते.
रताळ्यात पोटॅशियम भरपूर असल्याने नर्व्हस सिस्टमची सक्रियता योग्य राहाते. किडनी निरोगी ठेवण्यास मदत होते.