मान्सूनमध्ये अनेक प्रकारच्या बॅक्टेरियामुळे विविध इन्फेक्शन्स होऊ शकतात.
सध्या डोळ्यांच्या संसर्गातही वाढ होताना दिसत आहे. त्यापासून बचावाचे उपाय जाणून घ्या.
डोळे लाल होणे, सूज येणे, वेदना, जळजळ, डोळ्यांतून पाणी तसेच चिकट घाण येणे, ही डोळ्याच्या इन्फेक्शनची लक्षणे आहेत.
डोळ्याच्या इन्फेक्शनपासून बचावासाठी स्वच्छता पाळा, हात सतत धुवा.
टॉवेल, रुमाल, आय मेकअप, आय ड्रॉप यांसारख्या गोष्टी एकमेकांशी शेअर करू नका.
बाहेर जाताना चश्मा किंवा गॉगल लावा, त्यामुळे धूळ व उन्हापासून डोळ्यांचे संरक्षण होईल.
डोळे वारंवार चोळणं, त्यांना सारखा हात लावणं टाळा, त्याने इन्फेक्शन लगेच पसरतं.
डोळ्यात इन्फेक्शन झालं असेल तर लेन्स लावायची चूक करू नका आणि काळा चश्मा वापरा.