दररोज किती मीठ खावे?

दररोज किती मीठ खावे?

27 March 2025

Created By: मयुरी सर्जेराव

Tv9-Marathi

दिवसातून किती मीठ खावे आणि त्याचे योग्य प्रमाणात किती हे माहित आहे का?

जागतिक आरोग्य संघटनेनुसार, व्यक्तीने दररोज 5 ग्रॅम (सुमारे एक चमचा) पेक्षा जास्त मीठ सेवन करू नये

मीठ आपल्या शरीरासाठी महत्त्वाचं आहे. हे शरीरातील पाण्याचे संतुलन राखण्यास मदत करते.

नसा आणि स्नायूंच्या योग्य कार्यासाठी मीठ आवश्यक आहे.

मीठ रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते.

जर तुम्ही मीठ खाल्ले नाही तर तुमचा रक्तदाब कमी होईल आणि जर जास्त मीठ खाल्ले तर ते जास्त होईल. म्हणून, एक चमचा मीठ खाणे पुरेसे आहे.

जास्त मीठ खाल्ल्याने मूत्रपिंडांवर जास्त दबाव पडतो, ज्यामुळे मूत्रपिंडांच्या कार्यावर परिणाम होऊ शकतो.

जास्त मीठ कॅल्शियमचे उत्सर्जन वाढवते, ज्यामुळे हाडे कमकुवत होऊ शकतात