शरीरात Vitamin D कमी झाल्यास काय होतं? पातळी वाढवण्यासाठी काय करावं?
8 December 2024
Created By: Swati Vemul
हाडांचं आरोग्य राखण्यास, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी व्हिटामिन D महत्त्वपूर्ण
विविध शारीरिक कार्यंचं नियमन करण्यात व्हिटामिन D ची महत्त्वपूर्ण भूमिका
व्हिटामिन D ची पातळी सामान्यत: निरोगी व्यक्तींमध्ये 20 ते 40 नॅनोग्राम प्रति मिलीदरम्यान असते
जेव्हा ही पातळी कमी होते, तेव्हा शरीर अन्नरसातील कॅल्शियम प्रभावीपणे शोषू शकत नाही
त्यामुळे हाडं ठिसूळ होतात आणि फ्रॅक्चर, इतर आरोग्यविषयक समस्या वाढतात
व्हिटामिन D ची पातळी वाढवण्याचा सर्वांत नैसर्गिक मार्ग म्हणजे सूर्यप्रकाश
आठवड्यातून काही वेळा सकाळी 11 ते दुपारी 3 दरम्यान 15-20 मिनिटे घराबाहेर घालवण्याचा डॉक्टरांचा सल्ला
सूर्यप्रकाशासह दूध, संत्र्याचा रस आणि विशिष्ट तृणधान्ये यांसारखे काही पदार्थ व्हिटामिन D वाढवण्यास मदत करू शकतात
अंड्यातील पिवळं बलक आणि सूर्यप्रकाशातील मशरुमदेखील कमी प्रमाणात पोषक आहेत
'कुंडली भाग्य' फेम अभिनेत्रीने दिली 'डबल गुड न्यूज'; जुळ्यांचा जन्म
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा