मोशन सिकनेस म्हणजेच वेगामुळे गाडी लागण्यामुळे प्रवास करणं खूप त्रासदायक होतं
23 July 2024
Created By: Swati Vemul
मळमळ आणि चक्कर येणे कमी करण्यासाठी एक उपाय म्हणजे लिंबाच्या रसाचा सुवास घेणं
लिंबाचा रस मोशन सिकनेस कमी करण्यास मदत करतं असं मानलं जातं
मोशन सिकनेस कमी करण्यासाठी लिंबाच्या रसाचा सुगंध घेतल्यास मध्यवर्ती मज्जासंस्थेवर त्याचा प्रभाव पडतो
लिंबाच्या रसामध्ये लिमोनेन, सायट्रलसारखी संयुगे असल्याने त्यांचा मूडवर प्रभाव पाडण्याच्या आणि मळमळ कमी करण्यासाठी उपयोग होतो
श्वास घेताना ही संयुगे घाणेंद्रियाला उत्तेजित करू शकतात, ज्यामुळे मळमळपासून आराम मिळतो
अस्वस्थतेपासून मेंदूचं लक्ष विचलित करून मळमळ होण्याची शक्यता कमी करू शकतो
मात्र लिंबूवर्गीय फळांची अॅलर्जी असलेल्या व्यक्तींनी हा उपाय टाळावा
नैसर्गिक लिंबाचा रस किंवा तेल वापरणं देखील महत्त्वाचं, कारण कृत्रिम सुगंधामध्ये हानिकारक रसायने असू शकतात
वरिष्ठ गॅस्ट्रोएन्टेरोलॉजीस्ट यांनी याबाबतची दिली माहिती
तुळशीचं पाणी प्यायल्याने तणाव होऊ शकतो दूर
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा