मोबाईलमुळे कॅन्सर होतो ? एका कोडने चेक करा SAR वॅल्यू
13 March 2024
Created By : Atul Kamble
मोबाईल फोनच्या रेडीएशनने कॅन्सर होतो अशी चर्चा तुम्ही वारंवार ऐकली असेल
मोबाईलच्या रेडीएशनने कॅन्सर होतो असा कोणताही पुरावा किंवा संशोधन अजून तरी पुढे आलेले नाही
मोबाईलचे रेडीएशन धोकादायक असते. फोनचे रेडीएशन मोजण्यासाठी त्याची SAR वॅल्यु तपासा
SAR म्हणजे स्पेसिफिक एब्जॉर्बशन रेट, शरीराद्वारे शोषणाऱ्या रेडीओ फ्रीक्वेन्सीला मोजण्याचे युनिट आहे
एखाद्या फोनचा वापर होताना शरीर किती रेडीओ फ्रीक्वेन्सी एब्जॉर्ब करते. ते SAR व्हॅल्यूने मोजले जाते
फोन खरेदी करताना त्याची SAR व्हॅल्यू तपासली पाहीजे, एका कोडआधारे फोनची SAR व्हॅल्यू समजते
DOT ( डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन ) भारतात मोबाईल फोनसाठी 1.6W/Kg व्हॅल्यू निश्चित केली आहे
तुम्हाला फोनची SAR ची व्हॅल्यू सहज चेक करु शकता, त्यासाठी डायलिंग पॅडवर जावे लागेल
येथे *#07# टाईप करुन डायल करताच तुमच्या फोनवर एसएआर व्हॅल्यू दिसेल