प्राचीन काळापासून एक पवित्र वनस्पती म्हणून दारी राहणाऱ्या तुळशीला विशेष मान
17 July 2024
Created By: Swati Vemul
रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यापासून ते श्वसनाच्या समस्या सोडवण्यापर्यंत अनेक समस्यांवर तुळशीचं सेवन हे रामबाण उपाय
आहारतज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, तुळशीची पानं पाण्यात टाकून पिणं म्हणजे तुळशीचं पाणी पिणं
पाण्यात तुळशीची पानं 10 ते 15 मिनिटं भिजू द्यायची, वाटल्यास तुम्ही मंद आचेवर काही वेळ हे पाणी पानांसहित उकळू शकता
जास्त वेळ उष्णतेच्या संपर्कात तुळशीची पानं ठेवू नयेत अन्यथा फायदे कमी होतात
अगोदरच उकळलेल्या पाण्यात तुळशीची ताजी पानं किंवा वाळवलेल्या तुळशीच्या पानांची पावडर करून मिसळू शकता
हे एक नैसर्गिक डिटॉक्स पेय आहे जे तुमच्या शरीराला स्वच्छ करते
अँटीऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि इतर फायदेशीर पोषकसत्त्व असणाऱ्या हे तुळशीचं पाणी आरोग्याच्या विविध समस्यांवर रामबाण उपाय ठरतं
तुळशीला ॲडोप्टेजेन मानलं जातं, याचा अर्थ तुळस शरीराला तणावाशी जुळवून घेण्यास आणि संतुलन राखण्यास मदत करते
ज्यांची जीवनशैली फार तणावग्रस्त आहे त्यांनी दिवसातून एकदा हे तुळशीचं पाणी प्यायल्यास फायदा होऊ शकतो
चहामध्ये तूप टाकून पिणं खरंच आरोग्यदायी का?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा