honey_Blackpaper3

सकाळी उपाशी पोटी मधासह काळीमिरी खाल्याने आरोग्यावर काय परिणाम होतो? 

9 एप्रिल 2025

Created By:  राकेश ठाकुर

Tv9-Marathi
honey-5

मधासह काळीमिरी खाल्यान व्हिटॅमिन बी, सी, के, कॅल्शियम, आयर्न, झिंक, फॉस्फरस, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फायबर, मँगनीज, नॅच्युरल शुगर आणि अँटीऑक्सिडेंट मिळतं.

honey_Blackpaper2

मध आणि काळीमिरी दोन्हीमध्ये पोषक तत्त्वं आहेत. एकत्र खाल्ल्याने अनेक फायदे होतात. 

honey_Blackpaper

काळीमिरीमुळे पचनसंस्था मजबूत होते. अन्न लवकर पचण्यास मदत होते. तसेच मध आतडे स्वच्छ करते. बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. 

मधात बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा गुणधर्म आहे. यामुळे घशाला आराम मिळतो. काळीमिरी कफ बाहेर काढते आणि श्वसनमार्ग मोकळा करते. 

मधामुळे त्वचा तजेलदार बनते आणि डिटॉक्सिफिकेशनला मदत होते. त्यामुळे हे मिश्रण रक्त शुद्ध करण्यास मदत करते. त्वचा आणि केसांना नैसर्गिक चमक मिळते.

संधिवात, सांधेदुखी किंवा स्नायूंना सूज येणे यापासून या मिश्रणामुळे आराम मिळतो. 

एक चमचा मधात चिमुटभर काळीमिरी पावडर मिसळा. दररोज सकाळी रिकाम्या पोटी घ्या. यानंतर कोमट पाणी पिऊ शकता.