कारल्याचा कडवडपणा पाहून अनेकजण नाकं मुरडतात. पण आरोग्यासाठी लाभदायी आहे. आजारांशी लढा देण्याचे गुण आहेत.
कारल्यात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, कार्बोहायड्रेट, अँटीऑक्सिडंट, पोटॅशियम, फायबर, आयर्न आणि झिंक ही पोषक तत्व आहेत.
कारल्याचा रस काढताना त्यातून बिया काढून टाका.कारलं कापून त्यात पाणी घालून मिस्करमधून काढा. त्यात लिंबूचा रस आणि मीठ टाका.
होमेओपॅथी तज्ज्ञ डॉ. शैलेश मिश्रा यांनी सांगितलं की, कारल्याचा रस पिण्याची योग्य वेळ सकाळी रिकाम्या पोटी आहे. रोज एक ग्लास प्यायलात तर आजारपणात लढा देण्याची शक्ती मिळते.
मधुमेह असलेल्या रुग्णांना कारल्याचा रस फायदेशीर आहे. यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो. तसेच आरोग्य सुधारतं.
कारल्याच्या रसामध्ये व्हिटॅमिन्स आणि फायबर असतं. यामुळे पचनसंस्थेशी निगडीत समस्या दूर होतात.
कारल्याच्या रसामुळे लिव्हर डिटॉक्स करण्यास मदत होते. लिव्हरमध्ये सुधारणा होते.
रोज सकाळी रिकाम्या पोटी शेवग्याच्या शेंगा खाल्ल्या तर काय होईल?