बदाम किती दिवसात  खराब होतात?

25 April 2025

Created By: Namrata Patil

Tv9-Marathi
almonds 12

जेव्हा जेव्हा पौष्टिक अन्न खाण्याचा विचार येतो, तेव्हा डॉक्टरांपासून आरोग्य तज्ज्ञापर्यंत सर्वजण सुकामेवा खाण्याचा सल्ला दिला जातो. 

badam 13

सुक्या मेवामध्ये विशेषत: प्रथिने, फायबर, व्हिटॅमिन ई, मॅग्नेशियम आणि इतर अनेक पोषक घटक असतात. 

अनेकांना बदाम खाणं आवडते. मात्र ते किती दिवस टिकतात आणि किती दिवसांनी खराब होतात याचा कधी विचार करत नाही. 

आज आपण बदाम किती दिवसांनी खराब होतात, याबद्दल जाणून घेणार आहोत. 

बदामांचे शेल्फ लाइफ खूप जास्त असते. यासाठी ते योग्य पद्धतीने ठेवणं गरजेचे आहे. 

बदाम हे दोन वर्षांपेक्षा जास्त काळ खाण्यायोग्य असतात. 

जर तुम्ही कच्चे बदाम फ्रीज किंवा फ्रीजरमध्ये ठेवलात तर ते दोन वर्षांपेक्षा जास्त काळ टिकतात. 

तसेच जर बदाम भाजून हवाबंद डब्यात ठेवून फ्रीजमध्ये ठेवा. यामुळे ते वर्षभर चविष्ट राहतात. 

जर तुम्ही बदाम स्वयंपाकघरात ठेवले तर ते ३० दिवसात खराब होतात. 

बदाम खाल्ल्यावर तो जर आंबट किंवा तुरट लागत असेल तर तो खराब झाला असे समजावे.