18 March 2025
Created By: Namrata Patil
सध्या मुंबईसह महाराष्ट्रात उकाडा वाढत चालला आहेत. लोक थंडाव्यासाठी एसी, कूलर, पंख्याचा वारंवार वापर करतात.
जर तुमच्याकडे एसी असेल तर तुम्हालाही त्याबद्दल काही महत्त्वाची माहिती असणे गरजेचे आहे.
एकदा तुम्ही एसी घेतला आणि वर्षानुवर्षे जर तुम्ही तोच एसी चालवत असाल तर तुम्हाला सावध होण्याची गरज आहे.
विंडो एसी किंवा स्प्लिट एसी किती काळ टिकेल हे तुम्ही तुमच्या एसीची काळजी कशी घेता, त्यावर अवलंबून असते.
एसीचे आयुष्य त्याच्या गुणवत्तेवर देखील अवलंबून असते. काही कंपन्या एसीमध्ये जाड तांब्याच्या तारा वापरतात, तर काही हलक्या तांब्याच्या तारांचा वापर करतात.
एसीचे आयुष्य त्याच्या स्वच्छतेवरही अवलंबून असते. एसीमधील फिल्टर दर आठवड्याला स्वच्छ करा.
जर तुम्हाला एसीचे आयुष्य वाढवायचे असेल तर तुम्ही त्याची नियमित सर्व्हिसिंग करा.
विंडो एसीचा कंप्रेसर 5 वर्षे सुरळीत चालू शकतो. तर स्प्लिट एसीचा कंप्रेसर 10 वर्षे आरामात चालू शकतो.
कोणतीही कंपनी जास्त वॉरंटी देऊन नुकसान करू इच्छित नाही. याचा अर्थ विंडो एसीचे आयुष्य 5 वर्षे किंवा 6 वर्षे असू शकते, तर स्प्लिट एसीचे आयुष्य 10 वर्षांपर्यंत असू शकते.
एसीमध्ये लोकल पार्ट्स बसवणे टाळा. यामुळे एसीचे आयुष्य कमी होते.