टीम इंडियाच्या एका इशाऱ्यावर पंचांनी बदलला निर्णय, काय झालं?

7  July 2024

Created By: Rakesh Thakur

टीम इंडियाने दुसऱ्या टी20 सामन्यात जबरदस्त कमबॅक केलं. झिम्बाब्वेला 100 धावांनी पराभूत केलं.

टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 2 गडी गमवून 235 धावा केल्या. पण झिम्बाब्वेचा डाव 134 धावांवर आटोपला. 

या सामन्यात पंचांकडून एक चुकीचा निर्णय घेतला गेला. नवव्या षटकात पंचांनी रवि बिष्णोईचा एक चेंडू वाइट दिला. पण हा चेंडू योग्य होता.

झिम्बाब्वेच्या खेळाडूने रवि बिष्णोईला रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न केला होता. हा चेंडू लेग साइडवर होता. पण पंचांनी वाइड दिला.

भारतीय खेळाडूंनी या निर्णयाविरोधात आवाज उचलला आणि पंचांनी आपला निर्णय बदल चेंडू योग्य ठरवला. 

रवि बिष्णोई यान या सामन्यातही चांगली गोलंदाजी केली. 4 षटकात 11 धावा देत 2 गडी बाद केले.

"कालची कामगिरी निराशाजनक होती. पण आज आम्ही चांगलो खेळलो.", असं रवि बिष्णोई याने सांगितलं.