टोमॅटोचा वापर बहुतांश भाज्यांत होतो. पण सध्या बाजारात टोमॅटोचे भाव गगनाला भिडले आहेत. 

मात्र काळजीचे कारण नाही. ग्रेव्हीसाठी किंवा आंबटपणासाठी टोमॅटोऐवजी इतर पदार्थ वापरू शकता. 

भाजी घट्ट किंवा आंबट हवी असेल तर दोन्हीसाठी दह्याचा वापर उत्तम ठरतो.

आमटी किंवा भाजीत आंबटपणासाठी चिंचेचाही वापर करू शकतो.  

घरात चिंच किंवा टोमॅटो नसेल तर तुम्ही आंबटपणासाठी लिंबूही वापरू शकता की..

टोमॅटोऐवजी भोपळा किसून परतून घेऊन तो ग्रेव्हीसाठी वापरता येतो.

भाजीत आंबटपणासाठी आमचूर किंवा कैरी वापरू शकता.