पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध तणावाचे निर्माण झाले आहे.
26 एप्रिल 2025
Created By: जितेंद्र झंवर
भारताने सर्व पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करुन त्यांना देश सोडण्याचे आदेश दिले आहेत.
भारताने पाकिस्तानी नागरिकांना सार्क व्हिसा सूट योजनेअंतर्गत दिलेली सुटही रद्द केली आहे. या योजनेअंतर्गत मल्टी एन्ट्री व्हिसा मिळत होता.
भारताने आता पाकिस्तानचा व्हिसा करार रद्द केला असला तरी भारत त्या देशातील नागरिकांना दहा प्रकारचे व्हिसा देत होता.
मल्टी एन्ट्री व्हिसा पाकिस्तानी नागरिकांना अटारी-वाघा सीमेवरून किंवा हवाई मार्गाने भारतात येण्याची परवानगी देणारे होते.
डिप्लोमेटिक व्हिसा पाकिस्तानी राजदूत आणि कॉन्सुलर मिशनशी संबंधित लोकांना व्हिसा दिला जात होता. तसेच गैर-राजनयिक सदस्यासाठी गैर-राजनयिक व्हिसा दिला जात होता.
व्हिजिटर व्हिसा पाकिस्तानी नागरिकांना भारतात राहणाऱ्या त्यांच्या नातेवाईकांना आणि मित्रांना भेटण्यासाठी दिला जात होता. त्या व्हिसावरुन ते ३ महिन्यांपर्यंत राहू शकत होते.
ऑफिशियल व्हिसा आंतरराष्ट्रीय किंवा व्यावसायिक कार्यक्रमांसाठी भारतात येणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना दिला जात होता. तो व्हिसा १५ दिवसांसाठी वैध असतो.
पाकिस्तानी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी व्हिसा दिला जात होता. भारतात उपचारांसाठी वैद्यकीय व्हिसा दिला जात होता. त्याचा कालावधी ३ महिने आहे. त्याचप्रमाणे भारतात आगमनानंतर व्हिसा देण्याचीही तरतूद होती.