तळहाताला खाज आली की खरंच पैशांचा पाऊस पडतो? तज्ज्ञ काय म्हणतात...
25 April 2025
Created By: Namrata Patil
जर तुम्हाला तुमच्या तळहाताला खाज सुटत असेल तर तुम्हाला पैसे मिळतात, असं म्हटलं जातं.
हस्तसामुद्रिक शास्त्रानुसार, उजव्या तळहाताला खाज येणं हे पैसा मिळण्याचे संकेत असतात.
पण जर डाव्या तळहाताला खाज येत असेल तर आपले आर्थिक नुकसान होणार आहे, असे म्हटले जाते.
मात्र तज्ज्ञांच्या मते तळहातावर खाज येणं हे आजाराचे लक्षण असू शकते.
वारंवार हात धुतल्यामुळे देखील हाताला खाज येऊ शकते. अशावेळी तुम्ही क्रीम किंवा मॉइश्चरायझरचा वापर करा.
जर तुम्हाला मधुमेह असेल तरीह तुमच्या हाताला खाज सुटते.
तुमच्या तळव्याला सातत्याने खाज येत असेल तर अॅलर्जी हे त्यामागेच कारण असू शकते. त्यामुळे कोणतेही नवीन उत्पादन वापरण्यापूर्वी काळजी घ्या.
आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत साबण, हँडवॉशचा वापर करतो. यात रासायनिक घटक असतात. ज्यामुळे तुमच्या त्वचेला अॅलर्जी होऊ शकते.