तुम्हालाही वाटतं साखर पूर्णपणे सोडून दिली पाहिजे? चुकीचा विचार करताय, का ते पाहा

20 November 2024

Created By: Mayuri Sarjerao

साखरेचे जास्त सेवन करणे आपल्या शरिरासाठी नक्कीच नुकसानकारक आहे.

जास्त साखर खाल्ल्याने वजन वाढतं, मधुमेह होण्याचा धोका असतो तसेच हृदयासंबंधीचे आजार होऊ शकतात

पण यासाठी तुम्ही पूर्णपणे साखर बंद करण्याची गरज नाही

मर्यादेत साखरेचे सेवन करणे आपल्या शरिरासाठी चांगले मानले गेले आहे

WHO च्या म्हणण्यानुसार दिवसाला किमान 25 ग्रॅम म्हणजे 6 चमच्या पर्यंत साखरेचे सेवन करू शकतो

प्रमाणात साखरेचे सेवन केले तर थकवा किंवा अशक्तपणा कमी होण्यास मदत होते

साखर आपल्या मेंदूला थकण्यापासून रोखते आणि कामावर फोकस करण्यासाठी मदत करते

साखरेमुळे सेरोटोनिन हॉर्मोनचा स्तर वाढतो त्यामुळे आपला मूड चांगला राहण्यास मदत होते

त्यामुळे पूर्णपणे साखर न सोडता प्रमाणात खाणे योग्य

ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे त्यांनी मात्र डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या