कोणत्या पदार्थांना पचायला किती वेळ लागतो हे माहिती आहे का?

17 December 2024

Created By: Atul Kamble

अन्न पचायला बराच वेळ लागतो. अन्न पदार्थांचे पचन होऊन रक्तात ते घटक अब्जॉर्व करण्यासाठी २४ ते ७२ तास लागतात

व्यक्तीचे आरोग्य, मेटाबोलिझम,वय आणि जेंडर यावरही अन्नपचनाचा वेळ ठरते.

 कोणते पदार्थ किती प्रमाणात खाल्ले आहेत यावर देखील त्यांच्या पचनाचा कालावधी अवलंबून असतो

पाणी पचायला १० ते २० मिनिटे लागतात. जेवणानंतर पाणी पिले तर पचायला २ तासाहून अधिक काळ लागतो.

ज्यूस, चहा, कॉफी, सोडा पचायला २० ते ४० मिनिटांचा वेळ लागतो

स्मूदी, प्रोटीन शेक सारखे घट्ट तरल पदार्थ पचायला ४० ते ६० मिनिटे लागतात

 मासे - अंडी पचायला ३० ते ५० मिनिटे लागतात.अंड्याचे बलक पचायला ३० मिनिटे लागतात.संपूर्ण अंडे पचायला ४५ मिनिटे लागतात

 भारतीय जेवणात भात, चपाती आणि डाळ पचायला १ ते ३ तासांचा वेळ लागतो. यात कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटीन असते

 दूध,पनीर आणि लोण्यासारखे डेअरी प्रोडक्ट पचायला २ ते ४ तासांचा वेळ लागू शकतो. कारण त्यात फॅट आणि प्रोटीन असते

बदाम, काजू, अक्रोडसारखे ड्रायफ्रुट्स पचायला अडीच ते तीन तासांचा वेळ लागतो. कारण यात फॅट असल्याने सुमारे दोन तास लागतात

 चिकनमध्ये प्रोटीन आणि फॅट अधिक असल्याने पचन होण्यासाठी १२ ते २४ तासांचा वेळ लागू शकतो, मासांहारी जेवण पचण्यास शरीराला अधिक वेळ आणि ऊर्जा लागते