कोंब आलेले बटाटे जेवणात वापरता? तर ही माहिती तुमच्यासाठी आवश्यक
7 December 2023
Created By : Mahesh Pawar
कोंब आलेले किंवा थोडेसे हिरवे झालेले बटाटे खरेदी करू नका.
कोंब आलेले बटाटे खाल्ल्यामुळे विषबाधा होण्याची शक्यता असते.
असे बटाटे खाऊन उलट्या, जुलाब किंवा पोटदुखी अशी लक्षणे दिसल्यास लगेच वैद्यकीय सल्ला घ्या.
कधी कधी रक्तदाब कमी होणे, ताप येणे, डोकेदुखी होणे यासारखी लक्षणे दिसू लागतात.
कोंब आलेले बटाटे अती प्रमाणात खाल्ल्यास मृत्यूही होऊ शकतो.
कांदे आणि बटाटे कधीही एकत्र स्टोअर करू नयेत. कांद्यामधील विशिष्ट वायूमुळे बटाट्यांना कोंब फुटतात.
बटाटे नेहमी हवेशीर आणि थंड अंधारलेल्या जागी स्टोर करावेत, म्हणजे बटाट्याला बुरशी येत नाही.
जिथे सूर्याची किरणे पोहोचू शकत नाही अशा ठिकाणी बटाटे ठेवावे.
फ्रिजमध्ये ठेवू नयेत. तसेच शक्यतो इतर भाज्यापासून लांब ठेवावेत.
कोंब फुटलेला बटाटा स्वयंपाकात वापरण्याऐवजी तो बागेत लावावा त्यातून बटाट्याचे नवीन रोप उगवते.
हे सुद्धा वाचा | घरात नवीन सून आणताना या महत्वाच्या गोष्टींकडे लक्ष द्या.