19  डिसेंबर 2024

पोस्ट ऑफिसमधील ही स्किम तुम्हाला करेल मालामाल, मिळेल दुप्पट व्याज

पोस्ट ऑफिसमध्ये किसान विकास पत्र एक बचत योजना आहे. भारत सरकारने 1988 मध्ये सुरु केली होती. 

यात किमान 1000 रुपयाने सुरुवात करता येते. जास्तीत जास्त कोणतीच मर्यादा नाही. पण 100 च्या पटीने गुंतवणूक करता येते. 

किसान विकास पत्रवर गुंतवणुकीची रक्कम मॅच्युरिटीवेळी दुप्पट मिळते. या स्किमचा मॅच्युरिटी कालावधी हा 10 वर्षांचा आहे. 

किसान विकास पत्रावरील व्याज दर प्रत्येक तीन महिन्यानंतर संशोधित केला जातो. सध्या 2023-24 मध्ये चौथ्या तिमाहित व्याज दर 7.5 टक्के आहे.

किसान विकास पत्रावरील मुदतपूर्तीवर मिळणारे व्याज हे करपात्र आहे.

किसान विकास पत्राचे पैसे मुदतीपूर्वी काढता येतात. पण 2.5 वर्षांचा लॉक इन कालावधी आहे.

किसान विकास पत्राला भारत सरकारचा पाठिंबा आहे. यामुळे ही सुरक्षित गुंतवणूक आहे.