भारतीय रेल्वेने रोज कोट्यवधी  प्रवासी प्रवास करतात.

1 November 2024

शताब्दी, राजधानी, वंदे भारत, दुरोन्तो, तेजस, सुवर्ण शताब्दी या प्रिमिअम ट्रेन एका ट्रेनला मार्ग देण्यासाठी थांबतात. 

या ट्रेनला मार्ग देण्यासाठी व्हिआयपी ट्रेन, व्हिव्हिआयपी ट्रेन थांबून जातात.

सेमीहायस्पीड ट्रेन असलेल्या वंदे भारत ट्रेनला त्या ट्रेनसाठी थांबवले जाते. 

भारतातील या एकमेव ट्रेनचे नाव आहे एक्सीडेंट रिलीफ ट्रेन. 

एक्सीडेंट रिलीफ ट्रेन जेव्हा प्रवासाला निघते तेव्हा चांगल्या चांगल्या व्हिआयपी ट्रेन थांबून जातात. 

भारतात रेल्वेचे मोठे जाळे आहे. जेव्हा एखादा अपघात होतो, तेव्हा एक्सीडेंट रिलीफ ट्रेन वैद्यकीय सुविधा देण्यासाठी निघते.

एक्सीडेंट रिलीफ ट्रेन खूप कमी वेळात अपघात स्थळी दाखल होते.